हर दिन हर घर आयुर्वेद निर्विकार आरोग्य दिनदर्शिका 2023, चे प्रकाशन 18 डिसेबर ला आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होणार

IMG20221216153120

हर दिन हर घर आयुर्वेदनिर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२३

2022 या वर्षीच्या धन्वंतरी जयंती निमित्त आयुष मंत्रालय घोषित हर दिन हर पर आयुर्वेद या संकल्पनेतून प्रेरित होऊन निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल ने प्रत्येक घरोघरी आयुर्वेद पोहोचावा, यासाठी निर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन करण्याचे नियोजन केले आहे.

त्यामुळे प्रत्येक घरात निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली असणार आहे. या दिनदर्शिकेचा उद्देश एकच आहे की घरातील प्रत्येक माणूस आरोग्याच्या दृष्टीने जागरूक व्हावा.त्यामध्ये दिनचर्या ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आरोग्यदायी महत्त्व, पौष्टिक पाककृती, आहारीय वर्ग त्याचे उपयोग, उपवासाला काय खावे, घरगुती कोणते उपाय करावे, आपली प्रकृती कशी काढावी त्याची आपल्या आजारांशी काही संबंध असतो का ?,

नक्षत्रवना मधील वनस्पतींचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे, शरीरात कोणते दोष असतात ते बिघडल्यावर कोणते आजार होतात व ते साम्यावस्थेत आणण्यासाठी काय उपाय करावेत.

पंचकर्म म्हणजे काय त्याने शरीर शुद्धी कशी होते, किती दिवस लागतात अशी सर्व माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे अशी माहिती निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल चे संचालक वैद्य निलेश लोंढे व संचालिका वैद्या सारिका लोंढे यांनी दिली

. तसेच आरोग्यदायी उपक्रम घराघरात पोहचायला हवे असे टाटा मोटर्स चे कामगार नेते सचिन भैया लांडगे यांनी मत मांडले. याच बरोबर निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवड मधील पहिले खाजगी १५ बेडेड हॉस्पिटल आहे जिथे ऍडमिट ची मेडिक्लेम ची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे यामध्ये २० हुन अधिक विविध विषयातील तज्ञ रुग्णांना मार्गदर्शन करतात.

यामध्ये सांध्याचे, मणक्याचे विकार, सोरायसिस, त्वचेचे विकार, दमा, छातीचे विकार, अम्लपित्त, पोटाचे विकार, मूळव्याध, भगंदर, बद्धकोष्टता, महिलांसाठी अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व उपचार, गर्भसंस्कार तसेच लहान मुलांच्या आजारामध्ये सर्दी, खोकला, दमा, प्रतिकार शक्ती वाढवणे, वजन उंची वाढवणे यांवर विशेष उपचारांची सोय आहे,

केसांचे विकार सौन्दर्य विषयक तक्रारी यासाठी वेगळी ओपीडी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे, हृदय रोग मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार यासारख्या जटिल आजारांसाठी काही संशोधित उपचार निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मधील तज्ञामार्फत केले जातात.

18 डिसेंबर रोजी होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यासाठी आमदार महेश दादा लांडगे भोसरी विधानसभा, तसेच महाराष्ट्रातील नामवंत वैद्या ज्योती सुंदर्गी, बैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य अतुल देशमुख, वैद्य संतोष सूर्यवंशी वैद्य जयकुमार ताम्हाणे, डॉ सुहास जाधव NIMA प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य, डॉ प्रताप सोमवंशी NIMA प्रेसिडेंट पिंपरी चिंचवड, डॉ जबिन पठाण WIMA प्रेसिडेंट, डॉ सारिका भोईर FPA प्रेसिडेंट, डॉ हेमा चंद्रशेखर BGPA प्रेसिडेंट श्री अविनाश चिलेकर मुख्य संपादक: PCB News, श्री. गिरीश गांधी मनकर्णिका पब्लिकेशन हे उपस्थित राहणार आहेत.

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल

Latest News