कारागृह व सुधारसेवाच्या अतिरिक्तपदी अमिताभ गुप्ता यांची बदली

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यांची पुन्हा पुण्यात बदली झाली आहे.कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.कारागृह व सुधारसेवाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Latest News