रिक्षा चालक धरणे, आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही जबरदस्ती करू नका..


पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
खासदार, आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी 19 डिसेंबर रोजी विधान भवन येथे पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक धरणे आंदोलन करतील, महाराष्ट्राच्या व भारतातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या त्या भागातील लोक एकत्र येऊन महाराष्ट्र सह देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील, हे इशारा आंदोलन असेल देशभरामध्ये एकाच वेळी आंदोलन होईल असे बाबा कांबळे यांनी सांगितले.
या वेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यावरती एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर गंभीरपणे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले
.महाराष्ट्र मध्ये २० लाखापेक्षा अधिक रिक्षा चालक मालक असून देशभरामध्ये रिक्षा टॅक्सी टुरिस्ट बस व इतर सर्व प्रकारच्या चालक व्यक्तींची संख्या सुमारे १५ कोटी आहे. या सर्व चालकांच्या प्रश्नांसाठी केन्द्र वर राज्य सरकार कडे प्रलंबित आहेत ते न सोडवल्यामुळे दिल्ली काश्मीर गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार सह सर्वच राज्यातील रिक्षा टॅक्सी टुरिस्ट परमिट मध्ये व्यवसाय करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये संताप आहे
संघटनेच्या मागण्या
१) रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा.
२) रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा.
३) मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा.
४) रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा.
५) मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा.
६) पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा.
आंदोलनामध्ये कुणालाही जबरदस्ती करू नये रिक्षा बंद नाही धरणे आंदोलन आहे स्वइच्छेने सहभागी होतील त्यांनाच सहभागी करून घ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही जबरदस्ती करू नका असे आवाहन बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालकांना केले आहे