कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील ठराव मंजूर…

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरावाची घोषणा करताच विधानसभेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणने विधानसभा दुमदुमली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा ठराव मांडला आणि विधानसभेतील उपस्थित सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यकत तो पाठपुरावा महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल….

दरम्यान, ठराव मंजूर झाल्यानंतर आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी देशात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. पण असा ठराव करण्याची हिम्मत दाखवली नाही. ती आपण दाखवली, असे सांगताच विरोधी बाकाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसच्या आमदारांनी गोंधळ घालताच मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा वगळून आभाराच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतरच विरोधक शांत झाले

आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडला. तो एकमताने मंजूर झाला. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ गावांतील इंच न इंच जागा महाराष्ट्रात समाविष्ठ करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली तत्पूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या ठरावात काही दुरुस्त्या सुचविल्या. त्यामध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या शहरांचा त्यात उल्लेख करण्यात यावा, अशी सूचना केली.

तसेच, या ठरावात काही व्याकरणाच्या चुका झाल्या आहेत. त्याही दुरुस्त करण्याचे सूचविले. सत्ताधारी बाजूने त्यावर सहमती दर्शविण्यात आली. मात्र, ठरावावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावण्यात आली

Latest News