बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर गंभीर आरोप…


सोलापूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) सोलापूर : शिवसेनेच्याउद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बार्शीचे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडिओ अंधारे यांनी व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओतील व्यक्ती मला राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने मारले, असे सांगितले आहे. त्यानंतरही आमदार राऊत यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे आपल्या आरोपात म्हटले आहे.
महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेत बोलताना अंधारे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.एका सभेत बोलताना अंधारे यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारले असे सांगणारा व्हिडिओ लावला. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आपल्याला आमदार राऊत यांच्या कार्यकर्त्याने मारले असल्याचे सांगत आहे, असे सांगून अंधारे म्हणाल्या की, संबंधित व्यक्तीला तलवारीने मारले तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आपले भाऊ आहेत. त्यांना खेकडा बिकडा म्हणू नका, असा टोमणा त्यांनी मारला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याबाबतही अंधारे यांनी भाष्य केले. ‘हे लोक संजय राठोड यांना क्लिनचीट देऊ शकतात,
ते सोलापूर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर काय बोलणार,’ असा सवालही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.ज्या रुग्णालयात हा माणूस आहे, त्या रुग्णालयाने अद्याप रिपोर्टही दिलेला नाही. बार्शीतील संबंधित व्यक्तीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. हल्ला करणारी व्यक्ती ही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला