लहानग्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अभिव्यक्ती शिबिर,आबेदा इनामदार महाविद्यालयाचा उपक्रम

IMG-20221227-WA0157

लहानग्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अभिव्यक्ती शिबिर
आबेदा इनामदार महाविद्यालयाचा उपक्रम

पुणे :

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आयोजित अभिव्यक्ती शिबिराला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. नाटक , चित्रकला आणि नृत्याचा वापर करून मुलांचे मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी या शिबिरातून प्रयत्न करण्यात आले.’सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट एक्टिव्हीटीज’ यांच्या सहकार्याने साळवेनगर, येरवडा येथे हे शिबिर झाले. मानसशास्त्र विषयाच्या आदित्य बीडकर, सरफराज शेख , रिझवाना पठाण या विद्यार्थ्यांनी संयोजन केले. शिबिरात 25 लहान मुले सहभागी झाली.प्राचार्य डॉ. शैला बूटवाला, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.अंजली केदारी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Latest News