पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण यांची चौकशी करा

– स्मार्ट सिटी प्रकल्पातून बेहिशोबी मालमत्ता कमविणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिका-यांची चौकशी करुन संपत्ती जप्त              

पिंपरी : शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून एरिया बेस डेव्हलमेंट आणि पॅन सिटी अंतर्गत कामे सुरु आहेत. महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी हे स्मार्ट सिटी कंपनीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण यांनी स्मार्ट सिटी च्या कामात करोडो रुपायाचा गैरव्यवहार केला आहे त्यामुळं त्याची चौकशी करून तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती ने पंतप्रधान कार्यालयाला निवेदनातून करण्यात आली आहे

स्मार्ट सिटीची कामे करताना कित्येक मर्जीतील कंपन्यांना कामे देण्यात आलेली आहेत. त्या कंपन्यांना दिलेल्या कामातून मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिका-याने भ्रष्टाचार करत कोट्यावधीची बेहिशोबी माया गोळा केली आहे.

पॅन सिटी मधून शेकडो कोटीचे प्रकल्प राबविले आहेत. त्यांनी केलेल्या प्रकल्पातून भ्रष्टाचार करत कोट्यावधी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता कमविली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात गेली तीन वर्ष झाले स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे सुरु आहेत.

पॅन सिटी प्रकल्पातून सुमारे चारशे ते पाचशे कोटीची कामे होत आहेत. यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किओक्स, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, मुन्सीपल ई– क्लास रुम, स्कुल हेल्थ मॉनिटरिंग, पब्लीक ई- टॉयलेट, सिटी मोबाईल एॅप अँड सोशल मिडीया, ई-क्लास रुम, पर्यावरण सेन्सर, स्मार्ट ट्राफिक, सिटी सर्व्हे लन्स, स्मार्ट पार्कींग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क, इंटीग्रेटेड कमांड कट्रोल सेंटर, ऑप्टीकल फायबर केबल, स्मार्ट वाटर सप्लाय, पब्लीक वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट सिव्हरेज, आयसीटी इनॅमल एसडब्ल्यूएम, स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टयु पार्क अँड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी, जीआयएस इनॅमल इआरपी इंक्लुदिंग मुनिसीपल सर्व्हिस लेव्हल बेंच मेकींग, युनीक स्मार्ट ऍ़ड्रेसिंग अँड ऑनलाईन इस्टॅब्लीशमेंट लायसींग्स असे विविध प्रकल्प राबविले आहेत. या सर्व प्रकल्पांची चौकशी होणे गरजेचे आहे.  या कामामध्ये संबंधित अधिका-यांनी अनेक कंपन्यांची आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत

 त्यामुळे संबंधित माहिती व तंत्रज्ञान अधिका-यांनी स्मार्ट सिटीच्या पॅन सिटीमध्ये राबविलेल्या प्रकल्पांची शासनस्तरावर स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करावी, त्यातून निलकंठ पोमण या संबंधित अधिका-याने भ्रष्टाचार करत कोट्यावधीची कमविलेली बेहिशोबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, संबंधित दोषी आढळल्यावर अधिका-याला महापालिका सेवेतून बडतर्फ करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी पंतप्रधान कार्यालयाला निवेदनातून केली आहे करण्यात आली आहे

                                                                                                                                                           

Latest News