रस्ता आणि आमचं नात गेल्या चाळीसं वर्षांचं आहे ते नवीन नाही:बाळासाहेब आंबेडकर

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -आता उलटं झालंय की ज्याला आपण काबूत ठेवलं पाहिजे तोच आपल्याला काबूत ठेवतोय ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. कारण यामुळं लोकशाही धोक्यात येत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला आमचं आवाहन आहे की, रस्ता आणि आमचं नात गेल्या ४० वर्षांचं आहे ते नवीन नाही. हा अधिकार आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर उतरलो तर जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्यासोबतच रस्त्यावर झोपावं लागेल

विविध विषयांसंदर्भात राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला आमच्यासोबत रस्त्यावरच झोपावं लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

नागपूरमध्ये मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते vba च्यावतीनं आज नागपूरमध्ये महापुरुषाच्या अपमानाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं म्हणून सरकारला विनंती आहे की, जी याचिका सांगितली होती ती ताबडतोब दाखल करा. कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या. ज्या जमिनींचा प्रश्न आहे तो सोडवा. हा केवळ अतिक्रमणाचा विषय नाही तर शहरांचा प्रश्न आहे

कारण अख्खी शहरंचं अतिक्रमित आहेत. हा प्रश्न अधिक जटील होण्यापूर्वीच ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्या नावावर ते बांधकाम करा.ज्यांनी पाच-सहा मजली इमारती बांधल्या आहेत, या सगळ्या अतिश्रीमंत व्यक्तींना आमचं आवाहन आहे की, तुम्ही आहे तिथं सुखी राहा पण सरकारनं आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळं तुम्ही देखील सरकारला सांगावं, सुप्रीम कोर्टाची आदेश मान्य करुन सरकारनं जमिनीवरील घरं त्यांच्या नावावर करावीत.

उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जोपर्यंत आपल्या अधिकरांसाठी लढणार नाही तसेच ज्याच्या हातात आपण सत्ता देतो तोपर्यंत तो आपल्या काबूत राहणार नाही

Latest News