माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर दिलासा दिला आहे. सीबीआयने पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावत त्यांच्या सुकटेचा मार्ग मोकळा केला आहे. उद्या (28 डिसेंबर) ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहे

१२ डिसेंबर २०२२ रोजीच जामीन मंजूर झाला होता. मात्र सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांचा जामीन अर्जाला मुंबई न्यायालयाने १० दिवस स्थगिती दिली होती.

२१ डिसेंबरलाही आज त्यावर सुनावणी झाली. देशमुख यांच्या जामीनावर ३ जानेवारीपर्यंत स्थगिती ठेवावी, असे सीबीआयने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले होते, यावर न्यायालयाने देशमुख यांच्या जामीनावर स्थगिती ता. २७ डिसेंबरपर्यंत वाढवली होती. अखेर आज त्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने त्यांना अटक केली होती. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नव्हता. तेव्हापासून ते तुरुंगात होते.

या प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे. देशमुखांना ईडीच्या तपासात जामीन मिळाला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी २० डिसेंबरला जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो.

मा. उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे

Latest News