युनाइटेड रिपब्लिकन पार्टी च्या वतीने चिंचवड विधानसभेसाठी सुधीर जगताप यांना उमेदवारी जाहीर

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक साठी आज युनाइटेड रिपब्लिकन पार्टी च्या वतीने चिंचवड विधानसभेसाठी सुधीर जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

कसबा आणि चिंचवड पुणे जिल्हयातील विधानसभा मतदार संघातपोटनिवडणूका होऊ घातल्या आहेत. या दोन्ही निवडणूका बिनविरोध करण्यातयाव्या याकरिता हालचाली सुरु आहेत. पत्र, टेलिफोन द्वारे आवाहन करण्यातयेत आहे

मक्तेदारीमोडून काढण्यासाठी जातीयवादालामुठमाती देण्यासाठी युनायटेड रिपब्लिकनपार्टी चिंचवड मतदार संघात निवडणूक लढणार आहे.पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधीर लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी घोषितकरण्यात येत आहे.

. दलित वंचित मागासवर्गीयसमुहांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुधीर ल. जगतापांची उमेदवारी आहे.पुणे जिल्हयातील वतनी जमिनदारांचे प्रश्न, वतनी जमिनीचे प्रचंड प्रमाणात झालेले हस्तांतर, गोरगरीब अशिक्षित वतनी जमीनदारांच्या गरिबी व अज्ञानाचागैरफायदा घेवून दाखविली गेलेली खरेदी व गहाणवट द्वारे शेकडो एकर जमिनीचेहया जमिनी जातीयवादी सत्ताधारी श्रीमंत शेतकऱ्यांनी हडप केलेल्या आहेत वत्याला जिल्हयातील राजकारणाची साथ आहे. या सर्व प्रकानाला वाचा फोडण्यासाठी चिंचवड विधानसभा लढवीत असल्याचे जगताप यांनी सांगितलं

Latest News