चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : आश्विनी जगताप यांचा भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल

IMG-20230206-WA0023

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता भाजपच्या अधिकृत उमेदवार स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चं पाटील, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लां यांच्या उपस्थितीत दाखल केले. तसेच त्यांच्या सोबतच शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सात फेब्रुवारी आहे. तर मतदानाची तारीख २६ फेब्रुवारी आहे. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आली होती. चिंचवड विधानसभा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.

थेरगाव येथील महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

यावेळी बोलताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी “ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता आपण प्रयत्नशील” असल्याचे सांगितले आहे.

यावेळी मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आदी उपस्थित होते

Latest News