चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक: राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी कडून वाढता विरोध? उमेदवारी दिल्यास पराभव अटळ?


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी साठी राहुल कलाटे यांना वाढता विरोध
राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक साठी राष्ट्रवादी कडून राहुल कलाटे यांचे नाव चर्चत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यास पराभव अटळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बैठकीत तसा निर्णय चर्चा झाली असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत
कोणालाही उमेदवारी द्या फक्त पार्टीसाठी प्रामाणिक कार्यकर्ते असणाऱ्या ला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी बैठकीत करण्यात आली आहे
आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्याचा प्रचार करणार नाही. पक्षातीलच इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकित केली आहे.असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे
चिंचवड पोटनिवडणूक: आयात उमेदवाराचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर!राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्याचा प्रचार करणार नाही. पक्षातीलच इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित बैठक केला आहेतशी मागणी अजीत पवार आणि पक्षाकडे करण्यात आली आहे
पिंपरी- चिंचवड शहरातील थेरगाव येथे राष्ट्रवादी पक्षाने पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त करत राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार हवा असा आग्रह धरला आहे. या बैठकीला आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, इच्छुक उमेदवार नाना काटे, राजेंद्र जगताप, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. परंतु, शिवसेनेचे नेते राहुल कलाटे हे राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याची शक्यता दर्शवली जात आहे. राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार हवा असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत धरला. तर, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढत पक्षश्रेष्ठी समोर तुमचे म्हणणे मांडले असून पक्ष जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा द्यावा लागेल असे त्यांनी सांगितले.
राहुल कलाटे यांना उमेदवारी दिल्यास त्याचा पराभव अटळ असल्याची ग्वाही मत राष्ट्रवादीचे पदाधिकारी उघडपणे बोलत आहेत.राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुकता दाखविली होती. दरम्यान मावळचे आमदार व चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीचे समन्वयक सुनील शेळके यांनी चिंचवड साठी आम्ही उमेदवार आयात करणार असे वक्तव्य करून राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.
राष्ट्रवादीने उमेदवार आयात केल्यास राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी नाराज होऊन निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ होणार असून पार्थ पवार यांच्या पराभवाची पुनरावृत्ती होणार असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.