मुक्ता टिळक यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक होतो :. शैलेश टिळक

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – , मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे अर्धवट स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही इच्छूक आहोत. टिळक घरातील सदस्याला उमेदवारी मिळाली पाहिजे होती. अशा परिस्थितीत नैसर्गिकपणे घरच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळते. यामुळे आम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा वाटत होती असे मत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र आता अखेरीस भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे

. यावर आता टिळक यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.”आम्हाला आशा वाटत होती की, आम्हाला उमेदवारी मिळेल. पण पक्षाने वेगळा विचार करून रासने यांना उमेदवारी जाहीर केले आहे. पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि रासने यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली आणि यावेळी निवडणुकीबद्दल चर्चा झाली. हा निर्णय दिल्ली वरुन होईल,” असे त्यांनी सांगितले”ताई गेल्यानंतर फडणवीसांनी आमची भेट फार कमी वेळासाठी घेतली होती, म्हणून काल ते पुन्हा घरी आले होते. विधानसभेचा वर्षभराचा कालावधी आहे, घरच्या सदस्याला दिली असती, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त होती. पण पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे,” असे टिळक यांनी स्पष्ट कले

“कुणालला एक संधी आहे, खूप गोष्टी शिकता येतील. कुणालकडे एक सुवर्णसंधी आहे त्याला की त्याचे व्यक्तिमत्व आणखी प्रगल्भ होऊ शकतं. पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. ब्राह्मणसमाजावर अन्यायाची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे.

Latest News