चिंचवड विधानसभा, आश्विनी जगताप, कसबा हेमंत रासने यांच्या नावाची भाजपा कडून घोषणा

पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. आज या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे

.पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत

मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली करत होतं. अखेर आज अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीचे (NCP) देखील या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांबाबत आज ठरणार आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे.

Latest News