महाविकास आघाडीत वंचित आल्यास महाराष्ट्रात वेगळं चित्र : विरोधी पक्ष नेते अजीत पवार


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र येऊन लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश व्हावा, ही माझी वैयत्तिक इच्छा आहे, असे मत विरोधी पक्ष नेते अजीत पवार यांनी व्यक्त केले
.दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मागील काही दिवसात महाविकास आघाडीच्या विपरीत काही वक्तव्ये केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “महाविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना, कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी.
वंचितचा मविआमध्ये समावेशाबद्दल अजित पवारांची पहिल्यांदाच महत्वाची प्रतिक्रया दिली आहे. वंचित बहुजन आघाडी हा शिवसेनेचा मित्र तर झाला मात्र, वंचितचा महाविकास आघाडीचा भाग होऊन, महाविकास आघाडीत वंचितच्या रूपाने चौथ्या मोठ्या गडीची भर पडेल का? याबाबत चर्चा सुरू होती, आता राष्ट्रवादीचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या विषयी भाष्य करत, वंचितच्या समावेशासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.
शिवसेनेनेसोबत आघाडी केली आहे. महाविकास आघाडी टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरता जे कोणी असतील त्यांनी यावं, याला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. महाविकासआघाडीसाठी अनेक जणांनी प्रयत्न करावे.