मला डावलून उमेदवारी देणे म्हणजे काँग्रेस पक्षाकडून अन्याय – बाळासाहेब दाभेकर

balasaheb-dabhekar

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – आजपर्यंत पक्षाकडे काहीही न मागता काम करत राहिलो. पण कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. मात्र मला उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे आज मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असून मला दुःख वाटते की पक्षाने माझ्या कामाची दखल घेतली नाही.’ अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी मांडली.

तर यावेळी मला डावलून काल आलेल्यांना उमेदवारी देणे म्हणजे काँग्रेस पक्षाकडून अन्याय झाल्याचे देखील ते म्हणाले. तर या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडुन येईल. असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे.

कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली असून कॉंग्रेसने महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. काल (दि.०६) या दोन्ही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर आज काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.पुणे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या बाळासाहेब दाभेकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

.यावेळी त्यांची काँग्रेस पक्षाकडून दखल न घेतली गेल्याची खंत बोलून दाखवत बाळासाहेब दाभेकरांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली.यावेळी बोलताना बाळासाहेब दाभेकर म्हणाले, ‘मी काँग्रेस पक्षाचा ४० वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे.

Latest News