कसबा पोटनिवडणुक’: काँग्रेस चे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची अखेर निवडणुकीतून माघार


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) शुक्रवारी (ता. १०) अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत दाभेकरांनी आपला अर्ज माघारी घ्यावा यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही दाभेकरांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनंती केली.यावेळी दाभेकरांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं.आज सकाळी बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेतली आहे
कसबा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले बाळासाहेब दाभेकर यांची भाजप आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बिडकर यांच्यासह पदाधिकार्यांनी बुधवारी रात्री (दि.८) भेट घेतली होती.
यावेळी भाजपकडूनही दाभेकरांना गळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच काँग्रेसच्या संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांच्यासह विविध नेत्यांनी भेट घेतली होती
. यावेळी काँग्रेस हायकमांडकडूनही बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकरयांची मनधरणी सुरु होती बाळासाहेब दाभेकर हे महाविकास आघाडीच्या वतीने कसब्यातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. ते गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांनी वारंवार उमेदवारी मागितली, मात्र, त्यांना डावलण्यात आलं. होत
काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत मंगळवारी (दि.७) आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. त्यांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती.
याचवेळी भाजपच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. अखेर महाविकास आघाडी आणि भाजपच्या शिष्टाईला मोठं यश आलं असून बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
काँग्रेसचे ४० वर्षांपासून काम करत आहे. पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांच्या पाठबळावर पोटनिवडणुकीत विजयी होईन असा विश्वास बाळासाहेब दाभेकर यांनी व्यक्त केला होता.
त्यांनी बंडखोरी केल्याचा फटका काही प्रमाणात काँग्रेसला बसेल अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. अखेर आघाडीसह भाजपच्याही शिष्टाईला यश आलं आहेअर्ज छाननीत दाभेकरांचा अर्ज वैध ठरला असून त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे.