215 कसबा पोटनिवडणुकीत भाजपने रासने यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा.. 


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा आणि तोच आमच्याकडून काढला आता आम्ही दाबणार नोटा (NOTA) असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. यासोबतच या फलकावर एका ब्राह्मणाचे चित्रही लावण्यात आले आहे. त्यासोबतच आणखी एक फलक लावण्यात आला आहे. त्यावरही अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधण्यात आला आहेकसबा मतदारसंघात जवळपास 13 ते 15 टक्के ब्राह्मण समाज आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातील व्यक्तींना किंवा ब्राह्मण समाजातील एखाद्या उमेदवाराला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. पण भाजपने ऐन वेळी हेमंत रासने यांना संधी दिली. तेव्हापासून ब्राह्मण समाजात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे ब्राह्मण समाजाचा उमेदवार डावलल्यामुळे हिंदू महासंघाचे आनंद दवे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण दवेंना पाठिंबा देण्याऐवजी आमची कोणत्याही उमेदवाराला पसंती नाही, असे सूचवत निवडणुकीत नोटा’चे बटणे दाबणार, असल्याचा सूचक इशाराही या फलकातून देण्यात आला आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच चर्चेचे पडसाद उमटल्याचे कसब्यात पाहायला मिळत आहेत. याचे कारण म्हणजे नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिराजवळ एक फलक लावण्यात आला आहे. या फलकावरील मजकूर पाहता पेठेतील ब्राह्मण समाजाच्या लोकांनी लावला की विरोधकांनी यावर आता चर्चा होऊ लागली आहे.हे सर्व पाहता, कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाजाची बहुसंख्य मते आहेत. या मतदारांना भाजपला मत देण्यासाठी प्रवृत्त करणे, हे आता भाजपसमोर असणार आहे. त्याचबरोबर कसबा मतदारसंघात असलेली पण शहराच्या इतर भागात वास्तव्यास गेलेली मतेही मतदानास आणणे, यासाठी भाजपने नियोजन सुरु केलं आहे. पण नाराजीचे फलकांमुळे भाजप समोर रोज नवे टेन्शन उभे राहत आहे.