राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे चिंचवडची निवडणूक चुरशीची होणार…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे चिंचवडची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
राहुल कलाटे यांनी २०१९ ला भाजप-शिवसेनेच्या युतीतून बंड केलं आणि खुद्द दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांनाच तगडं आव्हान देत १ लाख १२ हजार मते आपल्या पारड्यात खेचून घेतली. आता ते चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे.
आयत्यावेळी रिंगणात नाना काटेंना उभं केल्याने मुळचे शिवसैनिक असणारे कलाटे या निवडणुकीत नाना काटे भारी पडतील अशी भीती महाविकास आघाडीला होती. म्हणून राहुल कलाटे यांनी माघार घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण राहुल कलाटेंनी पक्षप्रमुखांच्या फोननंतरदेखील आपला निर्णय ठाम ठेवला आणि अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले
. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात बॅनर्स शहरात झळकू लागले आहेतचिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाविकास आघाडीत फुट पडल्याचं समोर आलं. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले.
इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन शिवसेना नेते सचिन अहिर हे सुद्दा राहुल कलाटेंच्या भेटीला आले होते. परंतू पक्षप्रमुखांच्या फोननंतरदेखील राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यानंतर आता राहुल कलाटेंविरोधात बॅनरबाजी पहायला मिळतेय. या बॅनरबाजीमुळे चिंचवडच्या राजकारणात वेगळंच चित्र पहायला मिळतंय. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे.चिंचवड येथील चाफेकर चौकात हे बॅनर झळकले आहेत
. कोणत्यातरी एका शिवसैनिकाने हे बॅनर्स लावले असावेत, असा अंदाज आहे. कारण त्यावरील आशयच तसा आहे. नाव न घेता राहुल कलाटे यांच्यावर या बॅनरबाजीच्या माद्यमातून निशाणा साधण्यात आला आहे. ‘ एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून- खरा शिवसैनिक ‘ अशा अशायाचे हे बॅनर्स आहेत. थोडक्यात शिवसेनेतून राहुल कलाटे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा या बॅनरबाजीनंतर रंगू लागल्या आहेत.