राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांचा राजीनामा मंजूर….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूर केला. कोश्यारी यांच्या जागी झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यावर भाष्य केले आहेनागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारीयांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘महाराष्ट्राचीसुटका झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी कोश्यारी यांचा राजीनाम्यावर भाष्य केले आहे.शरद पवार म्हणाले की, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याचा अतिशय चांगला निर्णय याआधीच घ्यायला पाहिजे होता. पण तो आता घेतला गेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती आपण पाहिली. पण, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांनी त्यामध्ये बदल केला आहे. ही अतिशय समाधानकारक बाब आहेराज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही असंविधानिक निर्णय घेतले असतील तर त्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शरद पवार यांनी या वेळी बोलताना केली. दरम्यान, याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विनंती मान्य झाल्यामुळे राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राने जेव्हा सांगितलं की, तुम्ही चुकताय. वादग्रस्त विधानं करत नेहमी करत असतात. महापुरुषांचा अवमान करत असतात. महाराष्ट्रात राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांवरुन किती गदारोळ झाला आहे. ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांनी, तळागळातल्या लोकांनी सुध्दा कोश्यारी यांना महाराष्टातून बाहेर काढा अशी मागणी करण्यात आली. पण तेव्हा का निर्णय घेतला नाही.केंद्र सरकारने भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यास दीड महिन्याचा कालावधी का लावला असा सवालही उपस्थित करतानाच कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राहावं असं कोणत्या व्यक्तीला वाटत होतं अशी घणाघाती टीकाही संभाजीराजे