अखेर केळकर समाधीने घेतला मोकळा श्वास !*


..अखेर केळकर समाधीने घेतला मोकळा श्वास !*
पुणे :समाधी उभारणीचे सुबक उदाहरण असलेल्या कै. गंगाधर केळकर समाधी शिल्पाने अखेर मोकळा श्वास घेतला असून मंदिर समजून काही लोकांनी केलेली लोखंडी कामे त्यांना समाधीबाबत माहिती मिळाल्यावर स्वतःहून काढून टाकली आहेत. ज्येष्ठ संग्राहक कै. दिनकर केळकर यांचे पुतणे आणि कै. गंगाधर केळकर यांचे नातू डॉ. श्रीकांत केळकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
ओंकारेश्वर मंदिरामागे भिंती जवळ नदीपात्रात असलेली कै.गंगाधर केळकर यांच्या समाधीला, समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेल्या १९२८ सालच्या समाधीचे मूळ स्वरूप बदलण्याचे प्रयत्न अनवधानाने काही लोकांकडून झाले होते. पण, त्या सर्वांची भेट घेऊन समाधीची माहिती देऊन मूळ स्वरूप कायम ठेवण्याचे आवाहन केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना केले होते.
गंगाधर केळकर यांचे नातू नेत्ररोगतज्ज्ञ डॉ श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी या समाधीला भेट देऊन पाहणी केली होती. तेथे येणाऱ्या -जाणाऱ्यांना समाधीबद्दल माहिती दिली होती. यावेळी केळकर कुटुंबातील डॉ श्रीकांत केळकर,अरुणा श्रीकांत केळकर,सत्यजित केळकर आणि सुधन्वा रानडे हे उपस्थित होते.
समाधी वास्तू उभारणीचा अप्रतिम नमुना असलेली ही रचना केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुनाही आहे. गंगाधर या शब्दाचा अर्थ शंकर असा असल्याने उभारणीच्या वेळेसच समाधीवर कलात्मकरीत्या पिंड(शिवलींग) बसवलेले आहे. *
समाधी वारसा जपण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी*डॉ. श्रीकांत केळकर यांनी सर्व माध्यमातून जागृती घडवून आणल्यावर समाधी जवळील काहीनी अनवधानाने उभारलेले फलक, लोखंडी काम स्वतःहून काढण्यात आले.केळकर कुटुंबीयांनी कै. गंगाधर केळकर समाधीस्थळ असा फलक तेथे उभारला
. आणि या समाधीला पूर्वरत आपली ओळख प्राप्त झाली. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही उपलब्ध आहेत.नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे