राज्य कामगार विमा महामंडळ, कार्यालय, मध्ये छत्रपती शिवाजी महाराजा ची जयंती उत्साहात साजरी…

shiv

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

– दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य कामगार विमा महामंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, बिबवेवाडी पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यालय प्रमुख उप संचालक प्रभारी श्री हेमंत कुमार पांडेय, उपसंचालक वित्त श्री चंद्रशेखर पाटील, श्री सतीश बाबर, श्री संदीप मालोकर, श्री मिरेंद्र भोसले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

श्री पांडेय यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.या प्रसंगी श्री सोपान झामरे, श्री पाटील व श्री पांडेय यांनी आपले विचार व्यक्त केले

.श्री पाटील यांनी आजच्या काळात शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रासांगिकता सांगून भारताच्या इतिहासातील शिवाजी महाराजांचे स्थान महत्वपूर्ण आहे हे सांगितले.शिवाजी महाराजांचे स्वराज्य व राष्ट्रा प्रतीचे समर्पण अधोरेखित करताना आज त्यांच्या विचारांची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणे आवश्यक असल्याचे सांगितले.श्री पांडेय यांनी अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराजांचे समाजसुधारणे विषयक कार्य व विचार सांगितले.शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था एक आदर्श राज्य व्यवस्था होती तसेच त्यांचे प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर बोलताना त्यांनी सांगितले की ते नौदलाचे जनक होते.श्री भूषण निकोसे यांनी शिवाजी महाराजांवर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वैभव दूधमल यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Latest News