विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार–भारती विद्यापीठ आयएमईडी आणि वॉर्टसीला कॉर्पोरेशन(दक्षिण कोरिया) सहकार्य करार

*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार* ————*भारती विद्यापीठ आयएमईडी आणि वॉर्टसीला कॉर्पोरेशन(दक्षिण कोरिया) सहकार्य करार

पुणे :विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय.एम.ई.डी.)ने वॉर्टसीला कॉर्पोरेशन(दक्षिण कोरिया)मध्ये सहकार्य करार झाला असून त्याअन्वये शैक्षणिक उपक्रमांमध्ये एकत्रित काम करण्यात येणार आहे . वॉर्टसीला कॉर्पोरेशनचे वरिष्ठ विकसन अभियंते यून क्यून्ग की यांनी भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम इ डी ) चे संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांची पुण्यात भेट घेऊन या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.उद्योजकता मार्गदर्शन, संयुक्त संशोधन आणि सल्लामसलत, कार्यशाळा, अतिथी व्याख्याने इत्यादींसाठी सामंजस्य करार उपयुक्त ठरेल. डॉ वेर्णेकर म्हणाले,’भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी ), पुणे या संस्थेला इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF)-2023 द्वारे संस्थेला भारतातील ३५ बिझनेस -स्कूलमध्ये स्थान देण्यात आले आहे. संस्थेचे सातत्यपूर्ण रेटिंग आणि सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार हे उत्कृष्ट कामगिरीमुळे मिळाले आहेत.उत्कृष्ट शिक्षणाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती, आधुनिक अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या सुवर्ण संधींमुळे आयएमईडी ही व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे. भारताच्या विविध भागातून ,२७ राज्ये आणि १० देश येथून विद्यार्थ्यांचा ओघ आय एम ई डी कडे आहे. एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांना या विद्यार्थ्यांची पसंती आहे.’भारती विद्यापीठ संस्थापक कै. डॉ.पतंगराव कदम , कुलपती प्रा.डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम आणि कुलगुरू प्रा.डॉ.विवेक सावजी तसेच उच्च व्यवस्थापनाकडून वेळेवर मिळालेल्या पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळेआयएमईडी नेहमी विविध उपक्रम यशस्वीरित्या राबवते,असेही डॉ वेर्णेकर यांनी सांगितले. *विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणारे सहकार्य करार* भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (आय एम ई डी ), पुणे यांनी अलीकडेच विद्यापीठ आणि उद्योग यांच्याशी सामंजस्य करार (MOU) केला. आय एम ई डी ने शिक्षक-विद्यार्थी देवाणघेवाण, संशोधन आणि सल्लामसलत यासाठी दक्षिण कोरियन विद्यापीठ-डोंग इयुई विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे. दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमधील उच्च अधिकार्‍यांनी सहकार्याची क्षेत्रे आणि पुढील वाटचालीचा तपशील देणाऱ्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, दोन्ही संस्थांचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि संशोधन आणि सल्लामसलत देखील संयुक्तपणे पार पडेल.फॅकल्टी-विद्यार्थी देवाणघेवाणीसाठी एमओयूचा एक भाग म्हणून आय एम ई डी चे विद्यार्थी स्वीडनमध्ये लिनस विद्यापीठात गेले. त्यांनी त्या विद्यापीठात सहा महिने घालवले आणि विविध व्यवस्थापन विषयांचा अभ्यास केला आणि त्या विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत संशोधन कार्य केले. या एक्सचेंजला स्वीडिश सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या लिनियस-पाल्मे प्रोग्रामद्वारे पूर्णपणे निधी दिला गेला.आय एम ई डी ने पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (PMA) आणि वेंकीज इंडिया लिमिटेड (पुणे मुख्यालय) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे . प्रत्येक आठवड्याला टॉप कॉर्पोरेट वक्ता आणि माजी विद्यार्थ्यांद्वारे तज्ञ सत्राद्वारे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी तयार केले जाते. प्रत्येक आठवड्यात विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट/माजी विद्यार्थी/उद्योजक सत्रे दिली जातात. ही सत्रे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील अंतर भरून काढतात. इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट, माजी विद्यार्थी मेळावा, एचआर मीट, कार्यशाळा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषद आणि इतर अनेक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञान, चालू घडामोडी आणि नवीन संशोधन पर्यायांबद्दल मौल्यवान धडे शिकतात.लिनियस युनिव्हर्सिटी, स्वीडन आणि युरोपियन इरास्मस प्रोग्रामसह शिक्षक विद्यार्थी गतिशीलता कार्यक्रमाद्वारे, अनेक आय एम ई डी विद्यार्थ्यांना ग्रीस, अर्जेंटिना, लिथुआनिया, युगांडा आणि स्वीडन येथे सर्व सशुल्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, पाच आय एम ई डी फॅकल्टींनी LNU, स्वीडनला भेट दिली आहे आणि आय एम ई डी विद्यार्थ्यांना 30 हून अधिक व्याख्याने दिली. *उद्योजकतेचे मार्गदर्शन करणारे उपक्रम* “प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ परीक्षार्थी न होता यशस्वी उद्योजक व्हावे,” या वृत्तीने डॉ. वेर्णेकर आणि टीम आय एम ई डी वर्षभर विविध अनोखे उपक्रम राबवतात. कॉर्पोरेट रिसोर्स सेल (CRC) द्वारे दरवर्षी आयोजित केलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये 150 पेक्षा जास्त MNC कंपन्या सहभागी होतात. यामध्ये Amazon, TCS, TATA AIG, Oracle, Reliance Industries, Hindustan Uniliver Ltd., Michelen Tyres, NEILSENIQ, ICICI प्रुडेन्शियल, एस बँक, आदित्य बिर्ला, एचडीएफसी, विप्रो यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे आणि त्यांना उद्योगासाठी तयार करणे या एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून, CWTED (Community Work through Entrepreneurship Development) हा आय एम ई डी चा अनोखा उपक्रम आहे. या सामाजिक उपक्रमाद्वारे विद्यार्थी स्वयंरोजगार असलेल्या लोकांना (रस्त्यावरचे विक्रेते आणि फेरीवाले) त्यांच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात.आय एम ई डी ने TCS सोबत त्यांच्या BBA विद्यार्थ्यांना त्यांच्या BPM कोर्ससाठी सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ता सुरक्षा आणि स्वच्छता मोहिमा, क्रीडा संमेलन, NSS उपक्रम, आय एम ई डी GEMS, C-Google, सायबर सुरक्षा, FIT India, IMAC राबविण्यात येतात. भविष्यात आय एम ई डी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक योजना आणि अनोखे उपक्रम राबवणार आहे.–

Latest News