सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण स्थगित,असलम इसाक बागवान यांचे उपोषण स्थगित


सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण स्थगित*——————-*असलम इसाक बागवान यांचे उपोषण स्थगित
* पुणे :कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.
२३ फेब्रुवारी रोजी सुरु केलेल्या उपोषण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याने २४ फेब्रुवारी रोजी स्थगित करण्यात आले. पालिकेच्या समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण यांनी बागवान यांच्या मागण्यांचा विचार करून त्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याबाबत चे लेखी आश्वासन दिले .
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शहरी गरीब योजने अंतर्गत अल्पदरात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमास सवलत देण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे सुमारे , तीन लाखांहून अधिक गरीब कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ मिळेल ही उपोषणाची उपलब्धी आहे. स्थानिक माजी नगरसेवकांनी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता
. ही सभागृहे उघडण्यासाठी आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली दोन वर्ष प्रयत्न करीत होते
.निविदा प्रक्रिया अवैध रित्या राबविल्या गेल्या. त्याला या उपोषणाद्वारे आक्षेप घेतला.ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात येईल,असे खेमनार यांनी सांगितल्याने बागवान यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
उपोषणास पाठिंबा देण्याकरीता सादिक मजाहरी,अन्वर शेख,रफिक स्पिकरवाले,सचिन आल्हाट ,नितीन बसरूर सोबत असंख्य कोंढवा नागरीकासोबतच माजी महसूलमंत्री बाळासाहेब शिवरकर, समाजवादी पक्षाचे कॅप्टन रानडे उपस्थीत होते