माय स्टेज ‘ आयोजित एकांकिका सादरीकरणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद

‘माय स्टेज ‘ आयोजित एकांकिका सादरीकरणाला प्रेक्षकांचा प्रतिसाद*……………………लगेच मिळणारी दाद ही कलाकारांसाठी संजीवनी : विनिता पिंपळखरे

पुणे :’माय स्टेज ‘ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘बिग बॉस ‘ आणि ‘पुढारी पाहिजे ‘ या दोन प्रसिद्ध एकांकिकांच्या सादरीकरणाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. २५ फेब्रुवारी रोजी भरत नाट्य मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता या एकांकिकांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, लेखिका विनिता पिंपळखरे , ज्येष्ठ कलाकार भालचंद्र करंदीकर, माय स्टेज ‘ संस्थेचे प्रशांत घैसास, ‘समर्थ कलाविष्कार ‘ संस्थेचे आशुतोष वैशंपायन , सुमंत शिंदे, सुरेंद्र गोखले उपस्थित होते .या वेळी बोलताना लेखिका विनिता पिंपळखरे म्हणाल्या,’ सिनेमा, शॉर्ट फिल्मच्या तुलनेत नाटकातील आविष्काराला लगेच पावती मिळते. ही लगेच मिळणारी पावती ही कलाकारांची संजीवनी असते. रंगमंचावर आलो की परत यावेसे वाटते. जिथे जमेल तिथे सादरीकरण करत पुढे जावे. म्हणजे रिहर्सल देखील प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा आवडत जाते.

सर्वच जण आपापल्या कामात असताना प्रयोगासाठी एकत्र येणं अवघड असते. पण,’ माय स्टेज ‘, ‘ समर्थ कलाविष्कार ‘ सारख्या संस्था तळमळीने काम करत आहेत.रंगमंच ही व्यवस्था तुम्हाला सतत काही देत असते, सतत काही शिकवत असते. त्यातूनच प्रयोग समृद्ध होतात.’ बिग बॉस ‘ चे लेखन विभावरी देशपांडे यांनी केले आहे, ‘माय स्टेज ‘ ने निर्मिती केली आहे. तर ‘पुढारी पाहिजे ‘ही पु. ल. देशपांडे यांची गाजलेली एकांकिका आहे . निर्मिती ‘ ‘समर्थ कलाविष्कार ‘ यांची होती. दोन्ही एकांकिकांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली..

Latest News