कसबा पोटनिवडणूक काँग्रेस चे रवींद्र धंगेकर विजय…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना केवळ ४ मते मिळाले आहेत. पुणेकरांनी या दोघांना नाकारलं आहे.12:04 pm, 2 Mar 2023आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १८ व्या फेरी अखेर ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत
. निकालापूर्वीच धंगेकरांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरवात केली आहे. कसबा पेठेत धंगेकरांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत आहेत .12:04 pm, 2 Mar 2023कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी आहे. मतमोजणी प्रारंभ झाला आहे.चिंचवड येथे विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप (bjp) आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे
.कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत.8:30 am, 2 Mar 2023चिंचवडमध्ये पोस्टल मतदानात ४०५३ मते मिळाली आहे. तर राहुल कलाटे १२७३, नाना काटे यांना ३ हजार ६०५ मते मिळाली आहेत. धंगेकर अडीच हजार मतांनी आघाडीवर आहे.धंगेकरांनी तीन हजारी आघाडी घेतली आहे.
रासनेंनी २ हजार ८०० मते हे पहिल्या फेरीत मिळाली आहे, अश्विनी जगताप यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली आहे.9:57 am, 2 Mar 2023अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत. कसब्यात सहाव्या फेरीत धंगेकर साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत
, तर चिंचवडमध्ये जगताप यांनी पाचव्या फेरी अखेर अडीच हजार मतांनी आघाडी घेतली आहेआठवी फेरी- रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.कसब्यात 11 हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली आहेत.