नागालँडमध्ये RPI चे 2 उमेदवारांचा विजय :रामदास आठवले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने येथे पहिल्यांदाच बाजी मारली आहे. त्यामुळे नागालँडमध्ये रामदास आठवले यांचा डंका दिसून आला आहेईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मतदान झाले होते. तर, त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारीला मतदान संपन्न झाले होते.आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार परडत आहे. या निवडणुकीत नागालँडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.आज नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत काही निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप-एनडीपीपी युतीला आघाडी मिळताना दिसत आहे दरम्यान, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. थोड्याच वेळात सर्व निकाल समोर येतील. त्यानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, आणि बहुमत कुणाला मिळाले हे स्पष्ट होणार आहे.

Latest News