पिंपरी चिंचवड महानगरपालि केच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती, कार्यक्रम केले जातात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव व दृष्टीकोन देतो. या सर्व गोष्टी विचारात घेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग विविध ठिकाणीवृक्षारोपण कार्यक्रम खालील सर्व ठिकाणी सकाळी ९ वाजता आयोजित करीत आहे.
क्षेत्रीय कार्यालय वृक्षारोपण ठिकाणे
१) अ क्षेत्रीय कार्यालय
बर्ड व्हॅली उद्यानासमोरचा रस्ता
आणि संत ज्ञानेश्वर उद्यान
२) ब क्षेत्रीय कार्यालय रावेत रोड म्हस्के वस्ती रस्ता
३) क क्षेत्रीय कार्यालय बोराडे वाडी मोशी प्रधान मंत्री आवास योजना
(४) ड क्षेत्रीय कार्यालय ड क्षेत्रीय कार्यालया समोर
(५) ई क्षेत्रीय कार्यालय जलतरण तलाव वडमुखवाडी
६) फ क्षेत्रीय कार्यालय- देहूरोड मिलटरी हद्द
७) ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव बोट क्लब
८) ह क्षेत्रीय कार्यालय पर्यावरण संस्कार केंद्र
तरी सर्व शहरवासीयांनी सदर मोहिमेत सहभागी होवून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा आणि आपले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ,सुंदर आणि हरित करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे..