कै. भिकू वाघेरे यांचे पिंपरी-चिंचवडच्या जडणघडीत महत्वाचा वाटा

  • दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील स्मृतीदिन कार्यक्रमात माजी महापौर उषा ढोरे यांचे प्रतिपादन

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पिंपरी, दि. 7 – एवढ्या वर्षे आठवणी जागवणे. तसेच, संस्काराचा वारसा जागविण्याची परंपरा वाघेरे कुटुंबाने जपली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत दिवगंत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या महत्वाचा वाटा आहे. त्याच्या वारसा पुढे चालू ठेऊन त्याच्या आठवणी जाग्या कराव्यात, हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मंगळवारी (दि. 6) केले.

दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळील त्यांच्या पुतळ्यास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेविका मंगला कदम, उषा काटे, सुमन पवळे, उषा संजोग वाघेरे-पाटील, शांती सेन, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, अरूण बोर्‍हाडे, हनुमंत नेवाळे, हरेश बोधानी, रंगनाथशेठ कुदळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेता दत्ता वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फझल शेख, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, संचालक शिवाजी वाघेरे, बिपीन नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळाआप्पा वाघेरे, विजुशेठ काटे, दिलीप देवकर, यशवंत साखरे, संयोजक माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील आदी उपस्थित होते.

यानिमित्त पिंपरी-चिंचवड समाज भूषण पुरस्कार पर्यावरणप्रेमी हिरामण भुजबळ यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘एक धाव पर्यावरणासाठी’ क्रॉसकंट्री स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत विविध 14 गटांत 850 धावपटू सहभागी झाली. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिरात 150 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी आधार रक्तपेढी व वायसीएम रूग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबिरात नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. माजी नगरसेविका उषा संजोग वाघेरे-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून होत असलेल्या मिलिटरी डेअरी फार्म उड्डाण पुलाचे आणि पॉवर हाऊस चौक ते पिंपळे सौदागर पुल रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील म्हणाले की, माजी दिवगंत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक व विधायक कामे केली जातात. गरजू विद्यार्थ्यांना सहाय केले जाते. विविध स्पर्धाचे आयोजन आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. लोगेश पंडाळकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे यांनी आभार मानले.

Latest News