पुणे महापालिकेतील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या 160 सेवकांना सेवेत कायम

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – पुणे महापालिके च्या समाज विकास विभागाचा हा १८७ जागांचा आकृतिबंध मान्य करावा व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० जणांना सेवेत सामावून घ्यावे, असा ठराव जानेवारी २०२० मध्ये केला होता.

देवेंद्र फडणवीसत्यानंतर या विषयाचा माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पाठपुरावा सुरू केला. उपमुख्यमंत्री यांचीही भेट घेऊन या प्रस्तावास शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणी केली. त्यांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास (दोन)च्या प्रधान सचिवांना दिले होते.त्यानुसार हा आदेश काढण्यात आला

पुणे महापालिकेतील समाज विकास विभागातील मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या १६० सेवकांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला आहे. हा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तसा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तर १८७ चा आकृतिबंध मंजूर केल्याने उर्वरित पदे थेट भरतीतून भरली जाणार आहेतमहापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना, उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मागासवर्गीय कल्याणकारी योजना, महिला व बाल कल्याण, युवक कल्याणकारी योजना, दिव्यांग योजना आदींचा समावेश आहे.

यासाठी यामध्ये समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालयीन सहाय्यक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, विरंगुळा केंद्र समन्वयक, स्वच्छता सेवक अशा १० पदांसाठी १८७ जागा आहेत. तेथे १६० जण काम करतात.

यांना या निर्णयाचा फायदा झाला आहेयाबाबत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, “महापालिकेच्या समाज विकास विभागात मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत अनेक वर्ष उलटसुलट पत्रव्यवहार चालू होते.

समाजविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभाग सकारात्मक असले तरी आदेश निघत नव्हते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हे प्रकरणा मार्गी लागले पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले

Latest News