पुणे लोकसभेची जबाबदारी मुरलीधर मोहोळ व शिरुर लोकसभा महेश लांडगे यांना जबादारी…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणेलोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांच्याकडेच निवडणूक प्रमुखाची जबाबदारी दिल्यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच baramati लोकसभा मतदारसंघात आमदार राहुल कुल यांच्यावर जबबादारी देण्यात आली आहे. तर शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांना जबादारी देण्यात आली आहेमावळमध्ये प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, हातकणंगले सत्यजीत देशमुख, सांगली दिपक शिंदे, सातारा अतुल भोसले, सोलापूर प्रशांत परिचारक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहेआगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील वडणूकप्रमुखांची घोषणा चंद्रशेखर बावनकुळेप्रदेशाध्यक्षयांनी केली. पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर देण्यात आली आहे.अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी खासदार पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राजकीय जीवनात प्रथमच महत्त्वाच्या पदावर अनुप यांना नियुक्ती मिळाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ २००४ पासून सातत्याने भाजपकडे राहिला आहे. संजय धोत्रे हे १४ व्या लोकसभेत सन २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १५, १६ आणि १७ व्या लोकसभेतही त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेले दोन वर्षांपासून हे गंभीर आजाराने ग्रासले असल्याने सक्रिय राजकारणापासून दूर आहेत.