सरकार मध्ये सहभागी होऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न – छगन भुजबळ


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या अनेक आमदारांसह बंडखोरी करत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पवार यांनी आज रविवारी (२ जुलै) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
.या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी छगन भुजबळ देखील उपस्थित होते भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. नरेंद्र मोदींवर अनेक वेळा टीका देखील केली मात्र त्यांच्या हातात देशाचं नेतृत्व सुखरूप आहे. विकासाच्या कामावर ते ताबडतोप निर्णय घेतात. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न भारत सरकार आणि राज्य सरकारच्या साहाय्याने सुटतील.”शरद पवार हे देखील बोलले आहेत की देशात मोदीच येतील. जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी शासनात जाऊन प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले
ईडी आणि सिबीआय यांच्या धाडीमुळे सरकारला पाठींबा दिला का? यावर छगन भुजबळ म्हणाले, सगळ्यांवर केसेस आहेत, असे नाही. अनेक आमदारांवर केसेस नाहीत. आम्ही सरकार मध्ये राहून आम्ही जनतेच प्रश्न सोडवू. राष्ट्रवादीवर दावा करत पुढची निवडणूक आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढू.
आगामी काळात आणखी अनेक चेहरे मंत्रिमंडळात सामील होणार आहेत. आज आपण सर्वांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.””पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ वर्षात देश चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे. आज पंतप्रधानांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत काही निष्पन्न होत नाही,” असे अजित पवार म्हणाले.