प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – शरद पवार


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला असून अजित पवार सरकारमध्ये सामिल झाले आहेत. यामध्ये जवळपास ३५ आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. त्यामुळं शरद पवारांनी आता तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे
– राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि मी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी सुनील तटकरे यांची तर पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली होती.
त्यामुळं आता या दोघांनी मला रितसर लिहून द्यावं किंवा मला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल
. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. माझी नाराजी कोणावर नाही पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली होती. पण सरचिटणीसांसाठी पक्षाची नियमावली बंधनकारक असते त्याचं उल्लंघन करुन त्यांनी कृती केली आहे.
त्यामुळं आता त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट त्यांनी स्वतः समजायला पाहिजे तसेच त्यांनी पुढं जायचं की नाही हे ठरवायला पाहिजे