सदाभाऊ खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारो राष्ट्रवादी काँग्रेस चे आंदोलन…


पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सातत्याने खा. शरद पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. या गोष्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून काल पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सदा खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारत आंदोलन केले.यावेळी ‘सदा खोत मुर्दाबाद’ , ‘अगोदर बिल द्या.मग ज्ञान पाजळा’, ‘खोताच्या बैलाला घो’, अशा प्रकारच्या घोषणा देत बालगंधर्व रंग मंदिराचा परिसर दणाणून सोडला
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,’शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेटलमेंट करत आमदारकी मिळविणाऱ्या सदा खोत नावाच्या आमदाराने आदरणीय पवारसाहेबांवर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली आहे.
टाकलेला तुकडा संपत आला की पुन्हा तुकडा मिळावा यासाठी गेटकडे पाहून रखवालदारीचा आव आणणाऱ्या या प्रवृत्ती केवळ आमदारकीची टर्म संपत आल्याने अशी विधाने करत आहेत.
‘आज सदा खोत यांच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत केले असलो, तरी भविष्यात जर अशा प्रकारची टीका टीपणी पुन्हा सदा खोत यांनी केली तर आम्ही त्यांच्या चेहऱ्याला काळे फासत त्यांच्या कृत्यांचा निषेध करू’, असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला
सदर आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, काकासाहेब चव्हाण, उदय महाले, आप्पासाहेब जाधव, मृणालिनीताई वाणी, स्वातीताई पोकळे, प्रभावतीताई भुमकर, नितीन कदम, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, दीपक कामठे, आनंदजी सावणे,राजू साने,युसुफ शेख,मनोज पाचपुते ,अनिताताई पवार,तन्वीर शेख, विविध सेलचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदाभाऊ खोत: शरद पवार सैतान आहेत. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. पवारांवर नियतीने,काळाने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. शरद पवार यांना त्यांचे पाप फेडावे लागत आहे, अशी जहरी टीका माजी मंत्री तथा रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी नवीन हाक आता महाराष्ट्रला ऐकू येत आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकू येत होती” असे सदाभाऊ खोत म्हणाले.