17 लाख रू त्वरित जमा करा भविष्य निर्वाह निधीत जमा करा, ठाकुर सावदेकर आणि कंपनी ला दिला आदेश,

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे येथे कार्यरत असलेल्या ठाकुर सावदेकर आणि कंपनी येथे बिडी उत्पादनाचे काम चालते येथे सुमारे 250 पेक्षा जास्त कामगार बिडी बनवण्याचे काम करतात या पैकी फक्त काही कामगारांनाच पी फ चे अंशदान चालू होते. व 78 कामगारांच्या पी फ च्या बाबतीत कायद्यानुसार लागु असलेले नियम, फायदे , लाभां पासून वंचित ठेवले होते.भविष्य निर्वाह निधी कायदातील तरतूदीनुसार 17 लाख 33 हजार देय रक्कम निश्चीत केली. या शिवाय 7 क्यूं नुसार व्याज व 14 बी नुसार दंड करून सर्व रक्कम 45 दिवसांत जमा करण्यासाठी आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या निदर्शनास आली. ही बाब संघटनेने कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले पण या बाबतीत व्यवस्थापनाने कोणतेही दखल घेतली नाही 78 कामगारांची पी फ रक्कम भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 अन्वये कायदेशीर कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली.होती.

पी फ कमिशनर ऑफिस पुणे ने दखल घेऊन श्री के. भानुप्रकाश व श्री संजय कोहाड यांची अंमलबजावणी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी व्यवस्थापन व संबंधीत कामगारांच्या कागदपत्रे, पुरावे यांची छाननी करून त्याचा अवहाल श्री योगेद्र सिंग शेखावत क्षत्रिय भविष्य निर्वाह आयुक्त पुणे 2 यांना सादर केला.

Latest News