पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. विवेक देबरॉय यांना “भांडारकर स्मृती” पुरस्कार जाहीर…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे, दि. 10 – पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ व इतिहास संशोधक डॉ. विवेक देबरॉय यांना यंदाच्या “भांडारकर स्मृती” पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी आज येथे दिली. बिहारचे महामहिम राज्यपाल मा. श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या शुभहस्ते गुरुवार, दिनांक 13 जुलै रोजी सायं. 5 वाजता भांडारकर संस्थेत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 1 लाख, मानपत्र व भांडारकरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले की, गेल्या वर्षी मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संशोधनात्मक काही पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. डॉ. विवेक देबरॉय यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे भाषांतर केले आहे.

Latest News