मणिपूरमधील हिंसाचार विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं घृणास्पद – शरद पवार

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मणिपूरमध्ये समाजकंटकांनी दोन महिलांची निर्वस्त्र काढलेली धिंड आणि केलेल्या अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं या लज्जास्पद घटनेची स्वत:हून दखल घेत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

या घटनेनंतर देशभरातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शरद पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे.‘मणिपूरमधील हिंसाचार, विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं घृणास्पद दृश्य पाहून मन विदीर्ण झालंय, असं शरद पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. ‘

मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची, त्यांच्यासाठी आवाज उठवण्याची आणि संघटित होण्याची हीच वेळ आहे. मणिपूरमध्‍ये शांतता प्रस्थापित करण्‍यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागानं तातडीनं योग्य ती कारवाई करणं आवश्‍यक आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. हे ट्वीट करताना त्यांनी उद्धृत केलेल्या डॉ. आंबेडकरांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. माणुसकी नसेल, तर तुमच्या कीर्तीला काहीही अर्थ नसतो…’ हे वाक्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना हे वाक्य ट्वीट केलं आहे. त्यांचा रोख अर्थातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं आहे.

Latest News