श्री संदीप सकपाळ सर यांना पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान..


ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- – सांगवडे ( ता. मावळ ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श मुख्याध्यापकांना नुकताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे , सर्व तालुक्याचे गट शिक्षाधिकारी
आदी मान्यवर उपस्थित होते..
संपुर्ण डिजिटल स्कूल , अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, स्वतची शाळाच नाही तर संपूर्ण तालुका डिजिटल करण्याच्या ध्यासाने मावळ तालुक्यातील 130 शाळांना लॅपटॉप व टॅब मिळवून दिले.
CSR अंतर्गत आतापर्यंत सव्वा करोड रुपये उपलब्ध केलेले आहेत
संदीप सकपाळ यांना यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार, मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार , पर्यावरप्रेमीं पुरस्कार, पिपंरी चिंचवड पर्यावरण पुरस्कार, पोलिस मित्र पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
पुरस्कार प्राप्तीबद्दल केंद्रप्रमुख विजय मारणे, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आमदार सुनीलआण्णा शेळके यांनी अभिनंदन केले.तसेच सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप, उपसरपंच योगेश राक्षे, कासारसाई संत तुकाराम कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर राक्षे, संचालक अमोल मोकाशी व शाळा व्यवस्थापन समिती सांगवडे यांनी सुद्धा अभिनंदन केले