तरूणांनी देशसेवा करण्यासाठी राजकारणात आले पाहिजे. -सुष्मिता देव


पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटीच्या स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या मास्टर्स इन पोलिटिकल लिडरशिप ॲण्ड गर्व्हन्मेंट अभ्यासक्रमाच्या १९ व्या बॅचची सुरवात सोमवारी करण्यात आली. यावेळी देव बोलत होत्या. कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते.देव म्हणाल्या, ‘तरूणांनी देशसेवा करण्यासाठी राजकारणात आले पाहिजे. राजकारणाविषयी कोणी काहीही सांगितले, तरीही शेवटी तुमची विचारधारा सर्वात महत्त्वाची असते. राजकारणात येण्यासाठी तरूणांनी ‘हौसला बुलंद’ ठेवायला हवा.’ वडेट्टीवार म्हणाले, ‘‘देशात राजकारण महागले आहे. राजकारणात सोपे नाही. आज आपण एका वेगळ्याच वळणावर आहोत. जिथे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सांगितले जात आहे. परंतु तरूणांनी माणसांना जोडणारे राजनीती करण्यासाठी राजकारणात यायला हवे ‘राजकारण ही एक प्रकारे देशसेवा आहे. परंतु सध्या भारतीय संविधानाला कमजोर केले जात असल्याची चर्चा आहे. लोकशाहीत सरकार न्यायव्यवस्थेला आणि प्रशासकीय व्यवस्थेला काय करायचे, काय करायचे नाही हे सांगते. त्यावेळी लोकशाहीचा खून होतो,’ अशा कठोर शब्दांत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार सुष्मिता देव भावना व्यक्त करत केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर टीका केली.ॲड. नार्वेकर म्हणाले, ‘एमआयटीमधील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा नागपूर आणि मुंबईमध्ये विस्तार करून त्या माध्यमातून राजकीय नेतृत्व घडविण्यासंदर्भात अभ्यासक्रम राबविण्यात येईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसोबत विधानमंडळाच्या सदस्यांनाही उपयुक्त ठरेल.अशा अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना विधानसभा सदस्यांसमवेत प्रत्यक्ष इंटरर्नशिपसारखे सोयी उपलब्ध करून देणे, तसेच विधानसभा सदस्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे.’ एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले.