पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोणतेही कर्मचारी पद भरती प्रक्रिया राबविली नसून अफवांवर विश्वास ठेऊ नये…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पीएमपीएमएल ने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या निगडी येथील आगारात शनिवारी (दि.7) दुपारी एक तरूण  नेमणूक आदेश घेऊन रुजू होणेबाबत आला.त्यानंतर निगडी कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी चौकशी केली असता महामंडळाकडून कोणतीही भरती झाली नसल्याचे व संबंधित नेमणूक आदेश बनावट असल्याचे व त्या तरुणाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.त्यांनंतर निगडी आगाराचे आगारव्यवस्थापक यांनी शनिवारी निगडी पोलीस स्टेशन येथे बनावट आदेश देणाऱ्या विरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रार दाखल केली आहे.तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोणतेही कर्मचारी पद भरती प्रक्रिया राबविली नसून अशा अफवावर विश्वास ठेऊ नये व फसवणूक टाळावी असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. अशी घटना घडली असता संबंधित नागरिकाने पोलिसांशी संपर्क (PMPML) साधावा.कर्मचारी पदाची कोणतीही भरती झाली नसून (PMPML) बनावट आदेशाने तरुणाची फसणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पीएमपीएमएल  प्रशासनातर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नये असे ही आवाहन पीएमपीएमएल ने केले आहे.

Latest News