मराठा आरक्षणा विरोधात शहरातील भाजप नेत्यांची भूमिका संशयास्पद!राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर

IMG_20231029_184319

मराठा आरक्षणाविरोधात शहरातील भाजप नेत्यांची भूमिका संशयास्पद!राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर यांचा घणाघात

पिंपरी :प्रतिनिधी :

पिंपरी चिंचवड शहरातील मराठा संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र अद्यापही शहरातील भारतीय जनता पक्षाच्या एकही आमदार, शहराध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणांसदर्भात आपली भूमिका स्पष्ट न केल्याने शहरातील भाजप नेते कातडी बचाव भूमिकेत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर यांनी केली आहे.

याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना कार्याध्यक्ष सागर तापकीर म्हणाले की, मराठा आरक्षणाला पाठींबा मिळावे यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा समाजासोबत या लढ्यात उतरला असून हा लढा राज्यातील प्रत्येक मराठा बांधवांचा लढा आहे. त्यामुळे या लढ्यात राजकारण न आणता यामध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत. तसेच दोघेही मराठा समाजाचे आहेत. मावळ लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार देखील मराठा समाजाचे आहेत. मात्र मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी अद्यापही आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. तसेच उघडपणे मराठा आंदोलनाला पाठींबाही दिलेला नाही. त्यांच्या याच कातडीबचाव भूमिकेला कंटाळून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी नुकतेच भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

पिंपरी चिंचवडआरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मराठा आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

शहरातील मराठा संघटनांचे कार्यकर्ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप एकही भाजप नेत्याने या आंदोलकांना पाठींबा दिलेला नाही. ही अत्यंत खेदाची बाब असून पिंपरी चिंचवड मधील मराठा समाज व सर्वसामान्य नागरिक तुमच्या या स्वार्थी राजकारणाला आगामी काळात त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात सागर तापकीर यांनी केला आहे.

Latest News