शिवप्रिया ‘ कथक नृत्य कार्यक्रमास रसिकांची दाद!.. भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

IMG-20231028-WA0429

‘ शिवप्रिया ‘ कथक नृत्य कार्यक्रमास रसिकांची दाद!…. ……………. भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘ शिवप्रिया ‘ या कथक नृत्य कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना आणि प्रशिक्षक ऋजुता सोमण यांच्या इशा सटवे,नेहा दामले या शिष्यांनी बहारदार कथक नृत्य प्रस्तुती केली

.त्यांना वेदांग जोशी(तबला),अदिती गराडे(हार्मोनियम),तुलसी कुलकर्णी(पढंत),श्रेया गंधे(गायन),पार्थ भूमकर(पखवाज) यांनी साथसंगत केली.हा कार्यक्रम शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.

मुक्ता देशपांडे आणि श्रीया अजरेकर यांनी सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १८६ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.

Latest News