PCMC: आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…

pcmc: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पिंपरी- चिंचवडमध्ये आढळलेल्या मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. अधीकच्या तपासात या ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलंय. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे

पिंपरी- चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज नुकतेच आढळले होते. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात नमामी झा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता या गंभीर गुन्ह्यात निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विकास शेळके या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले असून त्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या अटकेची गुप्तता पाळण्यात येत आहे

. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी ४३ किलो एमडी ड्रग्स जप्त केल आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसाकडूनच ४२ असे एकूण ४५ किलो एमडी ट्रक्स जप्त करण्यात आलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक चौक या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून दोन कोटी दोन लाख रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी नमामी झा याला अटक करण्यात आली. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासात पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेचे नाव पुढे आले असून ड्रग्जच्या या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळला आहे

. आरोपींना न्यायालयात घेऊन जाण्यात येत आहे. ड्रग्जच्या प्रकरणात थेट पोलिस उपनिरीक्षकाचा सहभाग असल्याने पिंपरी- चिंचवड पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. या ड्रग्जप्रकरणी आणखी खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे

मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं आहे. साधारण ४००० कोंटींचं ड्रग्स पुणे पोलिसांनी पुणे, सांगली आणि दिल्लीतून जप्त केलं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी विविध भागात पेट्रोलिंग सुरु केलं आहे.

. या ड्रग्स ची किंमत तब्बल ४५ कोटी इतकी आहे.पुण्यात मोठं ड्रग्स रॅकेट पकडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही ड्रग्स पकडण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही शहरातील पोलिसांनी ड्रग्स तस्करीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. शहरात माहिती मिळेल त्या ठिकाणी अजून ड्रग्स विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.