आधी अमोल कोल्हेनी घरासमोरील रस्ता नीट करावा – रुपाली चाकणकर

पुणे (ऑनलाईन न्युज परिवर्तनाचा सामना )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीका केली की त्यांना शिरुरमध्ये उमेदवारही मिळत नाही.

आधी अमोल कोल्हेंनी स्वतःच्या घरासमोरचा रस्ता नीट करावा.“बेडकाने छाती फुगवली त्याला वाटतं आपण बैल झालो असं वाटतं. उमेदवार वगैरे मिळत नाहीत अशी हास्यास्पद विधानं त्यांनी करु नयेत. कारण इतके दिवस मतदारसंघात न फिरकलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकाच्या निमित्ताने लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.असं मत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे

स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षात करता आला नाही. तरीही आपण मतदारसंघात आहोत असं सांगत आहेत. इतका आत्मविश्वास येतो कुठून हा प्रश्न आहेच

सुनेत्रावहिनी या विकासाच्या जोरावर सगळ्या उमेदवारांमध्ये निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. संधी मिळाली आहे त्यांना ही चांगलीच गोष्टच आहे. एकाच व्यक्तीला पंधरा वर्षे संधी मिळाली आता आदरणी सुनेत्रा वहिनीही चांगल्या मताधिक्याने निवडून येतील”

तसंच अजित पवार हे लवकरच लोकसभेचे उमेदवार जाहीर करतील. प्रत्येक जागेवर अजित पवार उभे आहेत असं समजूनच मतदान होईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला

. त्यानंतर आम्ही महिला भगिनींनी अजित पवारांचे आभार मानले कारण त्यांनी विकासाच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प सादर केला. तसंच महिला घटकांचा चांगला विचार केला आहे. आशा वर्कर यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसंच त्यांना न्याय देण्याची भूमिकाही आपण घेतली आहे असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Latest News