18 एप्रिलपासून मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा रणसंग्राम…..


पुणे: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
-पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभेत समावेश आहे. तर, भोसरी विधानसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे त्या दिवसापासून कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहे, हे स्पष्ट होत जाणार आहे
. त्यामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढत जाणार आहे. अर्ज आठ दिवस म्हणजे २५ एप्रिलपर्यंत स्वीकारले जातील. त्यातून अपक्षासह सर्व पक्षांचे उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. त्यांनतर खऱ्या अर्थान निवडणूक प्रचाराचा जोर अधिक वाढणार आहे.
दरम्यान, मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २१ दिवसांनी ४ जूनला मतमोजणी होणार आहे. मावळ लोकसभेची मतमोजणी म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. तर, शिरूर लोकसभेची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) एमआयडीसीतील शासकीय गोदामात होणार आहे.
पनवेल – ५ लाख ६५ हजार ९१५
कर्जत – ३ लाख ४ हजार ५२३
उरण – ३ लाख ९ हजार २७५
मावळ – ३ लाख ६७ हजार ७७९
चिंचवड – ५ लाख ९५ हजार ४०८
पिंपरी – ३ लाख ६४ हजार ८०६
एकूण – २५ लाख ९ हजार ४६१
मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून होणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर कोणत्या पक्षाचा कोण अधिकृत उमेदवार आहे, हे त्या वेळी स्पष्ट झाल्याने निवडणुकीची रंगत वाढत जाईल