पोर्शे कार प्रकरणात आणखी एक अपडेट ससूनच्या रक्त तपासणी विभागातील ‘तो’ कर्मचारी नॉट रिचेबल,

पोर्शे कार प्रकरणात आणखी एक अपडेट ससूनच्या रक्त तपासणी विभागातील ‘तो’ कर्मचारी नॉट रिचेबल, CCTV फुटेज तपासणार

             पुणे : (बिलाल शेख).   पुणे पोर्शे कार अपघातातील बिल्डर विशाल अग्रवाल  याच्या मुलाला वाचविण्यासाठी ससूनमधील  दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेऊन ब्लड सॅम्पलची आदला-बदल केली . या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांसह इतरही काहीजणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. घटकांबळे नावाच्या कर्मचाऱ्याकडून पोलिसांनी  काही पैसे जप्त केले आहेत. तर ससूनमधील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याचे  माहिती बाहेर येत आहे. हा कर्मचारी नेमका कोण?, हे अद्याप समजलेले नाही.

मात्र, ससूनमधील कोणीही कर्मचारी बेपत्ता नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पोलीस या कर्मचाऱ्याचा शोध घेत असल्याचे समजते. पोलिसांनी ससून रुग्णालयातील पुणे अपघातानंतरचे सीसीटीव्ही फुटेज  ताब्यात घेतले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

याबाबत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती  देताना सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये
दिसणाऱ्या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही,
त्याला जबरदस्तीने आणले जाईल.

Latest News