अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबाळेंना अटक का केली नाही.- अमोल मिटकरी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

अकोला पोलीस अधिकारी मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांची हॉटेलमध्ये जाऊन गळाभेट घेतात. तसेच मनसे पक्षाच्या लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. हे मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडतात, हे माहिती आहे. तसेच अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबाळेंना अद्याप अटक का केली नाही. असा सवाल अमोल मिटकरी केला आहे. दरम्यान दुसरीकडे कर्णबाळा दुनबळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधला आहे.राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. मात्र आता हे प्रकरण अधिकच तापले आहे. हल्ल्यानंतर अमोल मिटकरी आक्रमक झाले असून, या घटनेसाठी मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांना अटक करा, अशी मागणी करत त्यांनी आज (गुरुवार) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे माझ्यावर मनसेच्या गुंड्यांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली होती. तसेच अंबादास दानवे यांनीही मला फोन करून विचारणा केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला नाही. माझ्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांना जाग येणार का ? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

Latest News