लोकांनी माझ्याकडून अपेक्षा, लढा सुरू ठेवणार…जरागे पाटिल

जालना (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)

लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यामुळे दहा लोकं असो की दहा लाख, मी लढा सुरू ठेवणार असून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. नेत्यांनी दबाव आणला तरी घरात बसू नका. एवढ्या मोठ्या ताकतीने लढाई पुन्हा होणार नाही. अस मत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे

घरात टीव्हीवरून, इमारतींच्या गॅलरीतून आंदोलन पाहू नका तर रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष सहभागी व्हा. नोकरदार, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रातील सर्व मराठ्यांना आंदोलनसाठी एक दिवस द्यावा लागेल. तरच याची धग सरकारला जाणवेल. त्यातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. या आरक्षणाची काय किंमत आहे ते आपल्या लेकरांना विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई बंद पाडण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी ताकद लावली आहे. परंतु, मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा हा प्रश्न असून सर्व क्षेत्रातील मराठ्यांनी ताकदीने लढा द्यायचा आहे.

आता इमारतीच्या गॅलरीतून डोकावून पाहू नका तर प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. तरच सरकारला आंदोलनाची धग जाणवेल व ओबीसीतून आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी साताऱ्यातून राज्यातील सर्व मराठा बांधवांना केले.

सातारा शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर गांधी मैदानावरील आयोजित सभेत ते बोलत होते.मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला न्याय हवा असेल तर घराबाहेर पडावे लागेल. राजकीय नेते दबाव आणतील. पण दबावाला बळी पडाल तर लेकरांच्या आयुष्याचे वाटोळे होईल.

नेत्यांची लेकरे तुम्ही मोठे केली, त्यांना तुम्ही असला-नसला तरी काही फरक पडणार नाही.सततच्या उपोषणामुळे जरांगेंना अशक्तपणाकुणबी प्रमाणपत्र वैध ठरवल्यास हिसका दाखवेन
सरकारने न मागितलेले दहा टक्के आरक्षण दिले आहे.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघत असून त्याची अधिकारी वैध ठरवत नाहीत. येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास हिसका दाखवला जाईल, इशाराही जरांगे यांनी दिला.

Latest News