फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, कोर्टातूनच आपल्याला न्याय मिळू शकतो.- ॲड. प्रकाश आंबेडकर


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
जेव्हा आम्ही विरोधी पक्षांना पत्र लिहिले की, आपण हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टाच्या मार्फत निवडणूक आयोगाला विचारू की जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील, तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली ? हे आम्हाला सांगा.76 लाख मतदान हे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारांनीच केले आहे का? हे आपण विचारू पण, तेव्हा कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही.76 लाख आश्चर्यकारक मतदानवाढीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली असली, तरी आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.त्यामध्ये तरी विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे. फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, कोर्टातूनच आपल्याला न्याय मिळू शकतो. जर तुमचा लढा खरा असेल तर 76 लाख आश्चर्यकारक मतदानवाढ विरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिकेत एक पक्ष म्हणून यावे.कोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतो की, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक कशी झाली? ते आम्हाला सांगा.