कोथरूड पोलिसांच्या विरोधात एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची पोलीस महासंचालकांकडे मागणी

ps logo rgb

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

पूणे येथील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पीडित स्त्रीला मदत करणाऱ्या तीन मुलींचा चौकशीच्या नावाखाली जातीयवादी छळ केला गेला व त्याबद्दल संबंधित पोलिसांवर ऍट्रोसिटी कायद्याखाली एफआयआर नोंदविण्यासही नकार दिला गेला. या प्रकरणी “महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या” वतीने पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य, राज्य महिला आयोग, मानव अधिकार आयोग, मुंबई जिल्हाधिकारी या सर्वांना परिषदेच्या शिष्टमंडळाद्वारे जाऊन निवेदन देण्यात आले.

या निवेदनात याप्रकरणी नाहक बळी ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान पुनर्स्थापित व्हावा व संबंधित पोलिसांवर ऍट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पुणे येथील घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगून निवेदनात केलेल्या मागण्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच ही व अशी सर्व प्रकरणे माध्यमांनी जनतेसमोर आणून प्रश्न उपस्थित करावेत असा आग्रह करण्यात आला.
पत्रकार परिषदेला चयनिका शहा, हसीना खान व रेखा देशपांडे यांनी संबोधित केले.